इन्टाग्राम स्टार गाैतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचा धिंगाणा
राड्यामुळे गाैतमी पाटील पुन्हा चर्चेत, बघा कार्यक्रम नेमक काय घडलं
सांगली दि १(प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्त हावभावांमुळे सोशल मिडीयावर स्टार असणाऱ्या गौतमी पाटीलच्या सांगली जिल्ह्यातील लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांनी हैदोस घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथे ही घटना घडली. गौतमी पाटीलचं नृत्य पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी झाली होती. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
बेडग गावात एका मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्राक उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्यांचा आणि बेडग गावाचे नाव देशात गाजवणाऱ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्याच आले होते. याच कार्यक्रमात गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तिच्या नृत्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. तिचा कार्यक्रम सुरु होताच अनेकांनी जागा मिळेल तेथून गाैतमीचा डान्स पाहू लागले. त्यामुळे शाळेच्या कौलांचा चुराडा झाला. तार जाळीच्या कम्पाऊंडचेही मोठं नुकसान झाले आहे. त्याचबरोबर ज्या झाडावर प्रेक्षक बसले होते ते झाड देखील कोसळले. त्याचबरोबर झालेल्या चेंग-या चेंगरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मिरज ग्रामीण पोलिसांच्याकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. दत्तात्रय विलास ओमासे असे मृत व्यक्तीचा नाव आहे.

दरम्यान कार्यक्रमामुळे शाळेच्या झालेल्या या नुकसानीला कोण जबाबदार असा सवाल आता ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर या घटनेचा व्हिडिओ मोठ्याप्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण शाळेच्या आवाराच्या बाहेरील परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.