Just another WordPress site

नव्या प्रभागरचनेला पुणे राष्ट्रवादीचे न्यायालयात आव्हान

 पहा काय म्हणाले शहराध्यक्ष प्रशांत जगताप

पुणे दि ४ (प्रतिनिधी)- पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने निश्‍चित केलेली तीन सदस्यीय प्रभाग रद्द करत चार सदस्यीय करण्याचा निर्णय शिंदे सराकरने घेतला आहे. पण या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला आहे. न्यायालयात नक्की न्याय मिळेल, असा विश्‍वास शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला आहे.

GIF Advt

राज्य सरकारने पुणे महापालिकेसाठी २०१७ प्रमाणे चार सदस्यांची प्रभाग रचना अंतिम करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महापालिकेतील नगरसेवकांची संख्या १७३ ऐवजी १६६ होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका इच्छुक उमेदवारांना बसणार आहे. राष्ट्रवादी पहिल्यापासून दोन सदस्यीय प्रभागासाठी आग्रही राहिलेली आहे. पण आता भाजपाच्या फायद्याची चार सदस्यीय प्रभाग रचना झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता आहे. २०११ च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या ३५ लाख ५६ हजार ८२४ इतकी आहे. सरकारने घेतलेला निर्णयानुसार या शहराची लोकसंख्या तीस लाखापेक्षा अधिक आहे तेथे नगरसेवकांची संख्या १६१ ते १७५ या दरम्यान असावी असे स्पष्ट केलेले आहे. त्यानुसार प्रत्येक १ लाख लोकसंख्येसाठी एक नगरसेवक याप्रमाणे पाच नगरसेवक वाढतील. त्यामुळे १६१ अधिक पाच या प्रमाणे पुण्यातील नगरसेवकांची संख्या १६६ इतकी होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीने चार ऐवजी तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पुण्यात ५८ प्रभाग आणि १७३ नगरसेवकांची संख्या निश्चित करण्यात आली. त्यानुसार प्रभाग रचना करून आरक्षण देखील निश्चित करण्यात आले होते.पण आता प्रभाग रचना बदलल्यामुळे सर्व प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे.त्यामुळे निवडणूकाही सहा महिने लांबण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!