
मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीतील भाजप नेत्यांच्या ‘रेड सिग्नल’
वाचा भाजपच्या नेत्यांचा मंत्रिमंडळ विस्ताराला नकार का?
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज ‘आझादी का अमृत महोत्सव’ या बैठकीला हजेरी लावणार आहेत, तर रविवारी निती आयोगाच्या बैठकीमध्येही सहभागी होतील. या दोन दिवसांच्या दौऱ्यात दिल्लीतील भसजप नेत्यांशी गाठीभेटी घेऊन रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज्यात शिंदे सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेला तरी अद्याप मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळलेला नाही. त्यातबरोबर सत्तासंघर्षावर ८ तारखेला महत्त्वाची सुनावणी आहे. न्यायालयीन प्रक्रिया हे देखील विस्तार रखडण्यामागचे एक कारण आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस यांचा दिल्ली दाैरा महत्वाचा आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील आमदारांशी तातडीने चर्चा केली होती. विस्तार रखडल्याने आमदारांमध्ये धास्ती असल्याची चर्चा जोर धरु लागली होती.पण आता राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत राज्यपाल देखील आज दिल्लीत असणार आहेत. त्यामुळे यावेळी तरी मंत्रिमंडळाचा विस्ताराला मुहूर्त मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
शिवसेना बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार अद्याप कायम आहे. सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर अजून कोणताही निर्णय झालेला नाही. सोमवारी यावर सुनावणी होणार आहे. आता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवलं जाणार दुसरा कोणता निर्णय
होणार यांची शाश्वती नसल्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे.