‘शिंदे – फडणवीसांना आमची किंमत नाही’ शिंदे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप
स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा, भाजप शिंदे गट अडचणीत
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्यात आता शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणुक जाहीर करण्यात आली आहे. नाशिक, औरंगाबाद, नागपुर, कोकण शिक्षक या मतदारसंघात ह्या निवडणुकांसाठी मतदान येत्या ३० जानेवारीला होणार आहे. तर २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. पण निवडणूकीआधीच भाजपा शिंदे गटाला दणका देत आमदार बच्चू कडू यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजप शिंदे गटाचा मार्ग खडतर झाला आहे.
प्रहाचे नेते बच्चू कडू यांनी सर्वच्या सर्व जागा लढवणीवार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत आपली भुमिका स्पष्ट करताना कडू म्हणाले की, “शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये पाचही विभागात आम्ही उमेदवार देणार आहेत. त्यात मराठवाड्यात संजय तायडे, अमरावती किरण चौधरी, नरेश शंकर कोंडा हे कोकण विभागासाठी उमेदवार आहेत. तसेच अतुल रायकर हे नागपुर तर सुभाष जंगले हे नाशिक विभागातून उमेदवार असतील.पाचही विभागात निष्ठा, मजबूत आणि प्रहार म्हणून उभे करणार आहोत. मला आशा आहे की, यापैकी तिन जागा तरी प्रहारला मिळतील. या सर्वांची कल्पना आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली होती की आम्ही दोन ते तीन वर्षापासून याची तयारी सुरू केली आहे. त्यांना आमचाही विचार करून उमेदवार द्यावा, अशी विनंती केली होती. परंतु त्यांचा काही निरोप आला नाही. त्यामुळे आम्ही आमचे उमेदवार उभे केले आहेत. असे सांगत युतीत धुसफूस असल्याचे संकेत दिले आहेत.
राज्यात पदवीधर निवडणुकीचे बिगुल वाजले असून महाविकास आघाडीकडून काही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दुसरीकडे सत्तेत असलेले शिंदे-फडणवीस यांच्याकडून अद्याप कोणतीच भूमिका समोर आलेली नाही. पण शिंदे – फडणवीसांना आमची किंमत नाही’ म्हणत कडु यांनी मात्र वेगळी चुल मांडली आहे.