‘शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’ राणे मनातल बोलले?
नारायण राणेंचे ठाकरेंवर टिका करताना हे वक्तव्य, राणेंच्या वक्तव्यामुळे युतीत बेदीली?
मुंबई दि ८(प्रतिनिधी) – शिवसेना अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांची झाल्यानंतर भाजपाकडुन एकनाथ शिंदे यांच्याबरोबर युती करुन आगामी निवडणूका लढवण्यावर उत्सुक आहे. पण असे असताना भाजपातल्या बड्या नेत्याने थेट शिवसेनेवर जोरदार टिका करत शिवसेना संपलेला पक्ष आहे, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
भाजप नेते आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षाबद्दल मोठं वक्तव्य केले आहे. शिवसेना आता संपली आहे. काही राहिलेलं नाही, असे राणे म्हणाले आहेत. राणे म्हणाले की, पक्षाची वाताहत नाही तर यातायात झालेली आहे.उद्धव ठाकरेंची ताकदच नाही. मंत्रालयात येण्याची ताकद नव्हती. तर महाराष्ट्र पिंजून काढणार? शक्य आहे का? उद्धव ठाकरेंना बोलताना त्रास होतो, २० पावलं चालू शकत नाही. आणि तुम्ही उद्धव ठाकरेंचा घणाघात, अशी बातमी देता. वाघ दाखवायचा, अरे कशाला? ते वय राहिलेलं नाही आणि वयात काही करु शकले नाहीत”, असा टोला नारायण राणे यांनी लगावला. पण ही टिका करत असताना राणे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना ठाकरेंचीच असल्याचे म्हटले आहे. कारण निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदेंची असल्याचे म्हटले होते. पण राणेंच्या वक्तव्यामुळे नेमकी खरी शिवसेना कोणती? या प्रश्नावरुन पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
यावेळी उद्धव ठाकरे पंतप्रधान काय होणार?. हात वर केला की, खाली आणायला ३ मिनिटे लागतात. शिवसेना आता संपली, काही राहिलेलं नाही’, अशा शब्दात नारायण राणे यांनी ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला आहे. यावेळी राणे यांनी भास्कर जाधवांवर देखील निशाना साधला आहे.