Latest Marathi News
Ganesh J GIF

….म्हणून मंत्रीमंडळ विस्ताराला होतोय उशीर

विस्तार होत नसल्यामुळे इच्घुकांची धाकधूक वाढली

मुंबई दि ५ (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्रांती घेण्याचा डॉक्टरांनी दिलेला सल्ला, भाजपमध्ये मंत्र्यांच्या यादीवरून असलेली असहमती आणि आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त रविवारपर्यंत पुढे ढकलला गेल्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत राजभवनवर मंत्रिमंडळात समावेश होणार्‍या आमदारांची यादी पोहोचली नसल्यामुळे आजच्या मंत्रीमंडळाची चर्चा हवेतच विरली आहे.

एकनाथ शिंदे सततच्या दाै-यामुळे आजारी पडले आहेत. तर फडणवीस दिल्लीच्या दाै-यावर आहेत. आपल्या दिल्ली भेटीत ते मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप श्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. पण गृहमंत्री अमित शहा हे कर्नाटक दौर्‍यावर असल्यामुळे त्यांनी जे. पी. नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे उद्या त्यांच्या गटातील ४० आमदारांची बैठक घेणार आहेत. दुसरीकडे शिंदे राज्यातील सत्ता संघर्षाबाबत अॅड. उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा केली आहे. शुक्रवारी फडणवीस, शनिवारी राज्यपाल कोशारी, तर रविवारी मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दाै-यावर असल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रविवार पर्यंत होण्याची शक्यता धुसर आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून रोजी शपथ घेतली. तेव्हापासून राज्यात दोघांचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आहे. दोघांच्या मंत्रिमंडळावर चौफेर टीका होत असतानाही शिंदे गट आणि भाजपला मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लावणे शक्य झालेले नाही. एक महिना उलटूनही मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्हे दिसत नसल्याने इच्छुकांमध्ये घालमेल सुरु आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!