Latest Marathi News

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्या पक्षाची बाजी?

निवडणुकीचा निकाल जाहीर, पाहा कोणत्या पक्षाला किती जागा?

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- राज्यातील जवळपास साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल
जाहीर झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी दोघांसाठी फार महत्त्वाची होती. यामध्ये शिंदे-फडणवीस यांच्या युतीला
काैल मिळाला आहे.तर भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे.

ग्रामपंचायत निकालानुसार भाजपाला सर्वाधिक २०२३ ग्रामपंचायतीवर विजय मिळाला आहे तर राष्ट्रवादीने १२१५ ग्रामपंचायतीवर विजय मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे.तर ८६१ ग्रामपंचायतीवर ताबा मिळवणारी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर ७७२ जागा जिंकणारा शिंदे गट चाैथ्या क्रमांकावर आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेने ६३९ ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला आहे तर ११३५ जागांवर अपक्ष निवडून आले आहेत. भाजपा शिंदे गटाला एकूण २७९५ ग्रामपंचायतीवर सत्ता मिळाली आहे तर महाविकास आघाडीला २७१५ जागा मिळाल्या आहेत एकंदरीत या निवडणूकीत भाजपा शिंदे गटाचा वरचष्मा राहिला आहे. तर सरपंच निवडणूकीत भाजपाला १८७३ सरपंच पदावर विजय मिळवता आला आहे तर शिंदे गटाचे ७०९ सरपंच विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे १००७ सरपंच विजयी झाले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे ५७१ सरपंच विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे ६५७ सरपंच विजयी झाले आहेत तर ९६७ ठिकाणी अपक्ष सरपंच विजयी झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी करत तिसरा क्रमांकाच्या जागा जिंकल्या आहेत तर ठाकरेंची शिवसेना पाचव्या क्रमांकावर फेकली गेली आहे शिंदे आणि ठाकरेंच्या जागेची जुळणी केल्यास त्यांचा दुसरा क्रमांक असला असला असता पण फुटीमुळे जागा कमी आल्या आहेत.

या विजयानंतर भाजप आणि शिंदे गटाने जल्लोष केला असुन ही आपल्या कामाला जनतेकडून दिलेली पावती असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर महाविकास आघाडीनेही जनता आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. काही ठिकाणी मात्तबर उमेदवारांचा पराभव झाला असून काहींनी आपले गड राखले आहेत. तत्पूर्वी राज्यातील निवडणूक असलेली ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ६५,९१६ होती त्यापैकी १४,०२८ जागा बिनविरोध झाल्या होत्या तर ६९९ सरपंच बिनविरोध विजयी झाले होते. तर ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नव्हता. त्यामुळे तिथे पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!