Just another WordPress site

‘गद्दार खोके सरकारमुळे महाराष्ट्रा मागे पनवती लागली’

उद्धव ठाकरेंचे शिंदे फडणवीसांवर आसूड, काळी टोपी म्हणत राज्यपाल लक्ष्य

बुलढाणा दि २६(प्रतिनिधी)- जेव्हापासून खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलं तेव्हापासून पनवती सुरू झालीय. उद्योगधंदे तिकडे गेले तर राज्यात बेरोजगारी वाढेल, तरुणांना बेकार ठेवायचा. छत्रपतींचा अपमान करून आदर्श मोडायचा. यांना विठोबा कर्नाटकात पाठवायचा आहे असा घणाणात उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केला आहे. यावेळी ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली.

बुलढाण्यातील सभेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज्यपाल कोश्यारी यांचा समाचार घेतला ते म्हणाले की, आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना गुवाहाटीला जायची गरज भासली, मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. माझा आत्मविश्वास तुम्ही आहात. मी जिंकणार म्हणजे जिंकणारच. मुख्यमंत्री असतो तर तुमच्यावर आत्महत्येची वेळ येऊच दिली नसती. निवडणुका लांबवतायेत. मी तुमच्या भरवशावर उभा आहे. तुमच्या संकटात मी उभा आहे. आत्महत्या अजिबात करायची नाही. आपण शिवरायांचे नाव घेतो मग शिवरायांनी आपल्याला लढायचं शिकवल आहे. त्या काळ्या टोपीने अनेकदा छत्रपतींचा अपमान केला आहे.अब्दुल गटार, त्याने सुप्रिया सुळेचा अपमान केला. मी मुख्यमंत्री असतो तर कुठल्याही महिलेचा अपमान झाला असता तर लाथ मारून हाकलवून दिले असते अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारचा समाचार घेतला यावेळी शेतक-यांच्या वीजतोडीवरील कारवाईवर फडणवीसांना लक्ष करत जुन्या वाद्याची आठवण करून दिली.

GIF Advt

मी घरात बसूनही कामे केली, त्याचे कौतुक होतंय. कोरोना, शस्त्रक्रिया यामुळे बंधने होती. तुम्ही कुठे फिरता सुरत, गुवाहटी, गोवा. पोळ्याला बैलाला सजवलेलं पन्नास खोके. तुम्ही घेतलेले पन्नास खोके शेतकऱ्यांना दिले तर त्यांचे भले होईल. ह्या मिंधे सरकारकडून काही अपेक्षा नाही.असे म्हणत आज तात्पुरता सत्ता पण देशात तुमच्या कपाळावर गद्दाराची ओळख कायमची अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!