उपमुख्यमंत्री अजित पवारांना वेळीच आवरा अन्यथा….
महायुतीतील धुसफूस समोर, शिंदे गटाची भाजपाकडे तक्रार, दखल न घेतल्यास दिला 'हा' इशारा
मुंबई दि २२(प्रतिनिधी)- अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यामुळे शिंदे गटाचा मंत्रिपदाचा खास हिरावला गेला आहे. त्यातच भर बैठकीत अजित पवार यांनी ठाणे रुग्णालयावरुन शिंदेना प्रश्न विचारल्यामुळे शिंदे गट कमालीच अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे भाजपाची मात्र तारेवरची कसरत होत आहे. त्यामुळे महायुतीत धुसफूस वाढली आहे. त्यामुळे शिंदे गट मोठ निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादीला सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याचवेळी महत्वाची खाती देखील अजित पवार गटाकडे गेली आहेत. अजित पवार गट शिंदे गटावर कुठले निमित्त करून राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यातच ठाण्यातील रुग्णालयात झालेल्या मृत्यूप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट विचारणा केल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. पवार गटाकडून मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न केले जात असावेत, या शंकेने शिंदे गटात नाराजी आहे. त्यामुळे अजितदादांना वेळीच आवरावे, अशी मागणी शिंदे यांचे निकटवर्तीय भाजपच्या नेत्यांकडे करणार आहेत. ठाण्यातील घटनेचे निमित्त करून राजकीय कुरघोडी करण्याच्या अजित पवार यांच्या प्रयत्नांबद्दलही शिंदे गटात नाराजी आहे. शिंदे गटाच्या काही नेत्यांनी फडणवीस यांच्याकडे वस्तुस्थिती काय आहे, अशी विचारणा केली होती. त्यानंतर शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे या वादावर पडदा पडला असे वाटत असतानाच पुन्हा यामध्ये पवार गट आक्रमक झाला आहे. शिंदे गटाला सोबत घेताना फडणवीस यांची भुमिका महत्वाची होती, पण अजित पवार गटाला सोबत घेताना अमित शहांची भूमिका महत्वाची होती. त्यामुळे भविष्यात कोणाला झुकते माप मिळणार यावरुनही शिंदे गटात अस्वस्थता आहे. त्यामुळे शिंदे गट आता भाजपाकडेच गाऱ्हाने घालणार आहे. आगामी काळात भाजपाला दोन पक्षातील वाद मिटवून एकत्र काम करीत असताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
अजित पवार हे मुख्यमंत्र्यांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळेच अनेक कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र येण्याचं टाळत आहेत, अशी चर्चा आहे. शिंदे गटातील अनेक आमदारांच्या तोंडचा मंत्रिपदाचा घास हिरावला गेलेला आहे. त्यातच राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाल्यानं अनेक मतदारसंघातील गणित बदललेली आहेत. त्यामुळं विधानसभेला पुन्हा संधी मिळेल का, याची साशंकता शिंदे गटाला सतावत आहे.