Just another WordPress site

दरोडा टाकत अवघ्या काही सेकंदात लुटली बँक

बँक लुटीचा व्हिडिओ व्हायरल, तुम्ही सुद्धा चकित व्हाल

राजस्थान दि १८(प्रतिनिधी)- एक इंग्लिश वेब सिरिज मनी हाईस्ट आठवतेय कस? त्या बेवसिरिजमध्ये बॅक लूट दाखवण्यात आली आहे. संपुर्ण वेबसिरिज त्यावर आधारित आहे. पण सध्या राजस्थानमध्ये मनी हाईस्टला लाजवेल असा बँक लुटीचा प्रकार समोर आला आहे. यात चोरट्यांनी काही वेळातच बँक पूर्ण साफ केली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील जाडन गावातील एसबीआय बँकेत दरोडा पडला. दोन सशस्त्र हेल्मेटधारी दरोडेखोर बँकेत घुसले. आणि बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी बँक लुटली आहे. फक्त ६० सेकंदात ते बँकेतील पैसे आपल्या बॅगेत भरून फरार झाले. त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना प्रतिकार करण्याची सुद्धा संधी दिली नाही. ही संपूर्ण घटना बँकेच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बँकेत केवळ ५ कर्मचारी होते. दरम्यान त्यांनी हवेत गोळीबार करून कर्मचाऱ्यांना घाबरवलं. आणि ३ लाख रुपये घेऊन पसार झाले. पोलीस या दरोड्याचा तपास करत आहेत. गुन्हेगारांची हेल्मेट घातलं होतं त्यामुळे त्यांची ओळख पटवणं कठीण जात आहे.

GIF Advt

चोरी करणं हा गुन्हा आहे. पण तरी देखील काही मंडळी झटपट पैसा कमवण्याच्या उद्देशानं चोरी करताना दिसतात. पण राजस्थानात अवघ्या ६० सेकंदात बँक लुटीचा प्रकार घडल्यामुळे सारेच आवक झाले आहेत. पण हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत दरोडेखोरांना लवकरात लवकर शोधून काढून असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!