बापाच्या समोरच प्रियकराने केले मुलीचे अपहरण
मुलीच्या उत्तराने वडिलांबरोबर पोलीसांना धक्का, बघा नेमका प्रकार काय?
तेलंगाणा दि २१(प्रतिनिधी)- तेलंगणामध्ये एका १८ वर्षीय मुलीचे तिच्या वडिलांसमोरच चार जणांनी अपहरण केले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले. याआधीही ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती, कदाचित त्यानेच तिला नेले असावे. या मुलीला पळवून नेतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यात मंगळवारी एका १८ वर्षीय मुलीचे तिच्या वडिलांसमोर काही अज्ञात चोरट्यांनी अपहरण केले. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक अज्ञात व्यक्ती चेहरा लपवत थेट तरूणीला धरत पळवून नेण्याचा प्रयत्न करत असतो यामध्ये ती तरूणी पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण चोरटा तिला जबरदस्तीने गाडीत ओढतो. त्यानंतर गाडीचा दरवाजा बंद करतो. वडील त्या गाडीच्या मागे धावू लागतात पण चोरटे पळून जात असल्याचे या व्हिडिओमध्ये स्प्ष्टपणे दिसत आहे. या टोळीने आपल्या मुलीला पळवून नेण्यापूर्वी मारहाण केल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यातील एक आरोपी मुलीच्या गावातील असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे काही महिन्यापुर्वी ही मुलगी आणि अपहरण करणारा तरुण पळून गेले होते, पण पोलीसांनी समुपदेशन केल्यानंतर ते आपापल्या घरी परतले होते.
यानंतर मुलीने एक व्हिडिओ बनवत “एक वर्षापूर्वी आमचे लग्न झाले. तेव्हा मी अल्पवयीन असल्याने माझ्या आई-वडिलांनी ते मान्य केले नाही आणि माझ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता आम्ही प्रौढ झालो आहे, म्हणून आम्ही लग्न केले आहे. माझे पती दलित असल्याने ते अजूनही आक्षेप घेत आहेत, असा खुलासा त्या मुलीने व्हिडिओमध्ये केला आहे, तसेच पोलिस सुरक्षेची विनंती केली आहे.