पुतण्यावर आली ‘काकापासून मला वाचवा’ म्हणायची वेळ
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, बघा काका पुतण्यात नेमकं काय घडल
पुणे दि ९(प्रतिनिधी)- जमीनीसाठी भावाभावात किंवा भावकीत होणारी भांडणे नवीन नाहीत मात्र पुरंदर तालुक्यातील जेजुरी परिसरातून जमीनीच्या वादातून काकाने पुतण्या शेतात आल्याचे पाहून पुतण्यालस थेट रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची भयंकर घटना वागदरवाडीत घडली आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भास्कर त्रिंबक भुजबळ असे काकाचे नाव आहे. याप्रकरणी शारदा नानासाहेब भुजबळ यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वागदरवाडीत काका पुतण्याच जमिनीवरून भांडण आहे. काकाने पुतण्याच्या जमिनीत अतिक्रमण करून ऊस लावला आहे. त्यामुळे शारदा भुजबळ ऊस तोडणीचे काम थांबवण्या करता गेल्या होत्या. पण भास्कर भुजबळ याने अगोदर कर्जाचे पैसे द्या, असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच शिवीगाळ देखील केली. आरोपी भास्कर त्रिंबक भुजबळ यांनी त्यांचा पुतन्या स्वप्नील नानसो भुजबळ यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याच बरोबर पेटत्या टेभ्याने त्याला मारहाण केली. पण सुदैवाने पुतण्याने त्याला हुलकावणी दिली. आणि त्यामुळे त्याचा जीव वाचला. तर शारदा भुजबळ किरकोळ जखमी झाल्या आहेत. हातामध्ये पेटता टेंभा घेऊन तो पुतण्याच्या अंगावर मारतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या प्रकरणी काका भास्कर भुजबळ विरोधात तक्रार देण्यात आली आहे. जेजुरी पोलिसांनी शेतीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. याबाबतचं अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक कुंडलिक गावडे करीत आहेत.