Latest Marathi News
Ganesh J GIF

सोलापूर जिल्ह्यातील या १८ गावांना जायचे आहे कर्नाटकात

कर्नाटकात जाण्यामागे दिले हे कारण सरकारवर केले गंभीर आरोप

सोलापूर दि ३०(प्रतिनिधी)-कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील काही गावे आणि अक्कलकोट तालुक्यावर दावा सांगितला होता. त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. ते ताजे असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी कर्नाटकात जाण्याबाबत उत्सुकता दाखवली आहे. पायाभूत सुविधा मिळत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण झाले आहे.

आम्हाला रस्ता, पाणी, वीज, एसटी सेवा नियमित मिळत नसल्याने आम्ही वैतागून या निर्णयापर्यत पोचलो आहेत असा दावा या नागरिकांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतील १८ गावच्या गावाकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग, कुडल, बोळकवठा, औराद, बरूर, चिंचपूर, टाकळी, कुरघोट, लवंगी, बाळगी, भंडारकवठे, तेलगाव, कोर्सगाव, मुंडेवाडी, कुमठे, केगाव बुद्रूक, केगांव खुर्द, चिंचोली नजीक, सुलेरजवळगे, तडवळ, शेगाव, धारसंग, कल्लकजोळ आदी गावांनी आपला समावेश कर्नाटकात करावा अशी मागणी केली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अक्कलकोट आणि सोलापूरही कर्नाटकात घेऊ असा दावा केला होता त्यानंतर ही मागणी झाल्याने अनेक तर्कवितर्क उपस्थित केले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जत तालुक्यातील ४० गावांना दोन हजार कोटी रूपये देण्याची घोषणा केली आहे यातुन त्या भागात पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. अक्कलकोटमध्ये कन्नड भाषिक जास्त असल्यामुळे सरकार यातुन कसा तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!