Just another WordPress site

ताडोबातील वाघोबामुळे ही अभिनेत्री अडचणीत

व्हिडीओमुळे अडचणीत वाढ, तर अभिनेत्री म्हणते निसर्गाच्या सानिध्यात...

चंद्रपूर दि ३०(प्रतिनिधी)- ताडोबातील वाघोबामुळे अभिनेत्री रविना टंडन अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सातपुडा व्याघ्र संवर्धन केंद्रामधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविनाने नियमांचं उल्लंघन करुन सफारीदरम्यान वाघांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामध्ये तपास सुरु करण्यात आला आहे. एका व्हिडिओत तिने नियमाचा भंग करत वाघाच्या अगदी जवळ जात व्हिडिओ शूटिंग केल्याचा दावा करण्यात येत आहे.

उपविभागीय अधिकारी धीरज सिंह चौहान यांनी या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तपास कुरु केला आहे.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविना २२ नोव्हेंबरला जंगल सफारीसाठी ताडोबात आली होती. वाघ पाहण्यासाठी जंगलामधून जीपने फिरताना तिने नियमाचा भंग केला आहे. एका समोर आलेल्या व्हिडिओनुसार तिची टायगर सफारीची जीप वाघाच्या अगदी जवळ जाऊन थांबलेलीव दिसत आहे. तर कॅमेरा शटर्सचे फोटो काढताना होणारे आवाजही येत आहेत. अचानक हा वाघ या जीपकडे पाहून डरकाळी फोडतानाही दिसत आहे. वाघाची अगदी जवळ गेल्यामुळे रविनाबरोबर वाहनचालक आणि त्यावेळी कामावर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. तसेच त्यांची चाैकशी देखील केली जाणार आहे. तर रविनाने आपण कोणत्याही नियमाचा भंग न करता वाघाच्या हालचाली टिपल्याचे सांगितले आहे. पण ताडोबातील जंगल सफारी रविनाच्या वादाला फोडणी देणारी ठरली आहे.

GIF Advt

रविनाने सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या भेटीचे फोटो सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केले आहेत. या भेटीदरम्यान तिने काढलेले वाघाचे फोटोही ट्वीट केले आहेत. याच महिन्याच्या सुरुवातीला रविवाने भोपाळमधील वन विहार राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली होती. यावेळी काही लोक वाघाच्या पिंजऱ्यामध्ये दगड फेकत असल्याची तक्रार तिने केली आहे. पण आता तीच वाघाच्या जवळ गेल्याने वादात सापडली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!