Latest Marathi News
Ganesh J GIF

देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारणाऱ्या अभिनेत्रीवर ‘ही’ कारवाई

'कोंबडं कितीही झाकल्याने सूर्य काही उगवायचा राहत नाही,' म्हणत अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया, या पक्षाचा पाठिंबा

पुणे दि १०(प्रतिनिधी)- महाराष्ट्र नवनिर्माण सेना टोल मुद्द्यावर चांगलीच आक्रमक झाली आहे. त्याला पाठिंबा देखील मिळत आहे. राज ठाकरे यांच्या आंदोलनाला मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने पाठिंबा दिला आहे. त्यातच तिने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केला होता. त्यावरून वादंग निर्माण झाला आहे. पण यामुळे तेजस्विनीला एक सोशल फटका बसला आहे.


तेजस्वीने व्हिडिओ शेअर केल्यानंतर तिचे X अकाउंटचे ‘ब्लू टिक’ काढण्यात आले आहे. एक्सकडून व्हेरिफाइड अकाउंट्सना ब्लू टिक दिली जाते. या प्रकारामुळे आता तेजस्विनी यांनी संताप व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. माझ्या एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया अकाउंटचं व्हेरिफिकेशन राजकीय दबाव आणून काढून टाकलं. याचं कारण काय तर लोकांना माझं स्पष्टपणे व्यक्त होणं सहन होत नाही. वर्षानुवर्षे लोकांची फसवणूक करणाऱ्यांबद्दल बोललो, प्रश्न उपस्थित केला म्हणून असा राजकीय दबाव आणला गेला. ‘ब्लू टिक’ हा सन्मान असेल तर योग्य कारणांसाठी जाणं हा त्याहून मोठा सन्मान आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवादच, पण अशा बंदीने माझा आणि जनतेचा आक्रोश कमी होणार नाही. सामान्य लोकांचा आवाज बंद करणे हाच यांचा ‘X’ फॅक्टर आहे, असं स्पष्ट होत आहे. असो, पण माझा जय हिंद आणि जय महाराष्ट्रसाठीचा घोष योग्यवेळी सुरूच राहील, अशा शब्दांत तेजस्विनी यांनी ठणकावले आहे. तेजस्विनीच्या या ट्वीटला मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन रिप्लाय देण्यात आला आहे. तेजस्विनीनं टोल या विषयावर दाखविलेला ठामपणाचे मनसेनं कौतुक केलं आहे. राज्यसत टोलचा विषय पुन्हा एकदा पेटला आहे. यामुळे सरकार अडचणीत आले आहे.

तेजस्विनी पंडितने देवेंद्र फडणवीस यांचा टोलबद्दल बोलतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ते म्हणत होते,”शिवसेना-भाजपाची युती असताना आम्ही जी घोषणा तेव्हा केली होती त्यानुसार आता राज्यातील सगळ्या टोलवर आम्ही छोट्या गाड्यांना टोल मुक्ती दिली आहे. महाराष्ट्रात आपण केवळ कमर्शियल-मोठ्या गाड्यांचे टोल घेतो” यावर तेजस्विनी पंडीतने प्रश्न उपस्थित केला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!