Latest Marathi News

या अभिनेत्रीला करायचे आहे राहुल गांधी बरोबर लग्न?

लग्नाला होकार देत ठेवली विचित्र अट, सोशल मिडीयावर कमेंटचा पाऊस, म्हणाली लग्नानंतर...

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- खासदार राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते उत्साहित झाले आहेत. पण त्याचबरोबर त्यांच्या लग्नाची चर्चा देखील सुरु झाली आहे. सोनिया गांधी यांना देखील एका महिला नेत्याने राहुल गांधी यांचे लग्न करा असा आग्रह धरला होता. त्यामुळे राहुल गांधी यांची लगीनघाई सुरु झाली होती. पण आता एका अभिनेत्रीने राहुल गांधी बरोबर लग्न करायची इच्छा व्यक्त केली आहे. याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

शर्लिन चोप्राने नुकतेच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. शर्लिनने राहुल गांधींशी लग्न करण्यासाठी अट घातली आहे. शर्लिनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिला विचारण्यात आले की, ‘तुला राहुल गांधींसोबत लग्न करायला आवडेल का?’ उत्तरात ती म्हणाली, ‘हो का नाही.’ पण यासाठी शर्लिनने एक अटही ठेवली आहे. ती म्हणाली मी लग्न करायला तयार आहे. पण मी आडनाव मात्र बदलणार नाही. शर्लिनने गांधी कुटुंबाची सून होण्याची इच्छा व्यक्त करून नवा वाद निर्माण केला आहे. दरम्यान शर्लिनच्या वक्तव्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लोक विविध प्रकारे कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, यावर राहुल गांधींची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. बोल्डनेस आणि बोल्ड फोटोशूटसाठी प्रसिद्ध असलेली शर्लिन चोप्रा लाइमलाइटमध्ये राहण्याची एकही संधी सोडत नाही. ती अनेकदा एक ना एक विधान करत राहते ज्यासाठी तिला ट्रोल केले जाते.

बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि बिग बॉस फेम शर्लिन चोप्रा तिच्या बोल्डनेस आणि हॉट फोटोशूटसाठी ओळखली जाते. अभिनेत्री शर्लिन चोप्रा अनेकदा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत असते. शर्लिनच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती पौराषपूर सीझन २ मध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये ती रॉयल क्वीन स्नेहलताच्या भूमिकेत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!