Just another WordPress site

शिंदे गटाने हक्क सांगितलेल्या ‘या’ जागेवर भाजपाचा डल्ला

ठाकरेंचा उमेदवार निश्चित, भाजपाची कुरघोडीमुळे शिंदेची कोंडी

मुंबई दि १४ (प्रतिनिधी) – शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.मात्र भाजप शिंदे गटाची युती झाल्यानंतर होत असलेल्या पहिल्याच निवडणूकीत भाजपाने शिंदे गटाला धक्का देत आपला उमेदवार जाहीर केल्याची चर्चा आहे. या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने दावा सांगितला होता.

GIF Advt

रमेश लटके हे मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेना आमदार होते. मे महिन्यात हृदयविकाराच्या धक्क्याने रमेश लटके यांचे निधन झाले. त्यामुळे इथे पोटनिवडणूक होणार आहे. ऋतुजा लटके यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी गेल्याच आठवड्यात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिंदेंनीही उडी घेत आपला उमेदवार देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र भाजपाने त्यांना धक्का देत स्वतः या निवडणूकीत उडी मारली आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांना तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुरजी पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत.आपल्याकडील आमदारांची संख्या वाढवण्यासाठी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांसाठी ही पोटनिवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. तितकीच भाजपसाठीही मुंबई महापालिकेत आपली ताकत अजमावण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.

ठाकरेंना ही जागा राखण्याचं, शिंदेंना ही जागा जिंकण्याचं, तर भाजपला ही जागा बळकावण्याचं आव्हान आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री पद सोडले तर शिंदे गटाच्या पदरी सतत उपेक्षाच आली आहे.जे कारण सांगत बंड करण्यात आले होते तोच अवस्था इथे होत असल्याने शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!