Just another WordPress site

डॉक्टर तरुणीचं घरात घुसत दिवसाढवळ्या अपहरण

अपहरणाचा थरार कॅमे-यात कैद, कुटुंबीयांनाही बेदम मारहाण

हैद्राबाद दि ९(प्रतिनिधी)- हैदराबाद येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. घरात घुसून वडिलांना मारहाण करत एका मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ५० हून अधिक व्यक्तींनी घरात घुसून मुलीचे अपहरण केले. या घटनेचा व्हिडिओ एक व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केला असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

वैशाली असं २४ वर्षीय महिला डॉक्टरचं नाव आहे. राचकोंडा पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आदिबातला परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी एफआयआर दाखल केला. आरोपींच्या अटकेसाठी पथकं तयार करण्यात आली.शंभरपेक्षा अधिक जण घरात घुसले. त्यांनी घरात तोडफोड केली आणि मुलीच अपहरण केल्याचं वैशालीच्या कुटुंबीयांनी सांगितलं. वैशाली विरोध करत असतानाही घरात घुसलेल्या गुंडांनी तिला जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं आणि तिला घेऊन गेले. मुलीला तेथून घेऊन जाताना तिच्या वडीलांनी तिला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यांनी तिच्या वडीलांवर देखील हल्ला केला. वडीलांना बेदम मारहाण केली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या घटनेने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत आहे.

GIF Advt

पीडितेच्या वडीलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांचे एक पथक शोध कार्यात रवाना झाले. काही तासांतच पोलिसांनी मुलीची सुटका केली. तसेच यातील १६ जणांच्या मुसक्या अवळल्या. घटनेतील इतर आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!