Latest Marathi News

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाईफेक

शाळेसाठी भीक मागितली असे विधान भोवले शाईफेकीचा व्हिडिओ व्हायरल

पुणे दि १०(प्रतिनिधी)- पैठणमध्ये एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी फुले-आंबेडकरांनी शाळेसाठी भीक मागितली, असे विधान केले होते. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले असुन सर्व स्तरातून टिका झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. पण आज पुण्यात त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत शाईफेक करण्यात आली आहे.

पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर एकाने अचानक शाईफेक झाली. अचानक झालेल्या शाईफेक आणि घोषणाबाजीमुळे त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मनोज गरबडे असे शाईफेक करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो समता सैनिक दलाचा कार्यकर्ता आहे. पिंपरी चिंचवडमधील एक कार्यक्रम आटोपून निघत असताना अचानक समोर आलेल्या एका व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाईफेक केली. यावेळी त्यांच्याबाजूला सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्तेही होते. मात्र, काही कळण्याच्या आत त्यांच्यावर शाईफेक झाल्याने एकच खळबळ उडाली. सुरक्षारक्षकांनी शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला पाठलाग करत ताब्यातही घेतले.शाईफेक झाल्यानंतर शाई फेकणाऱ्यांनी ‘निषेध असो, निषेध असो’, ‘चंद्रकांत पाटील यांचा धिक्कार असो’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा विजय असो’, ‘महात्मा फुले यांचा विजय असो’,अशा घोषणा दिल्या.पोलीसांनी मनोज सोबत आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान शाईफेकचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ही शाईफेक झाल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया व्यक्त करताना संताप व्यक्त केले. मी कुणालाही घाबरत नाही. समोर या असे म्हणतानाच चंद्रकांत पाटील यांनी राज्यात झुंडशाही सुरू असल्याचे म्हटले आहे. निषेध करायचा असेल तर तो सनदशीर मार्गाने करता आला असता. या कृतीचा निषेध करा असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे यांना केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!