Latest Marathi News

दोन दारुड्यांची भर रस्त्यात एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण

पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप, नवीन वर्षातील पहिली हाणामारी जोरदार व्हायरल

ओैरंगाबाद दि १(प्रतिनिधी)- नवीन वर्षाचे स्वागत करताना म्हणजे थर्टी फस्टला अनेकांनी ओली पार्टी केली. पण, औरंगाबादमध्ये दारूच्या नशेत दोन दारूड्यांनी रस्त्यावर चांगलाच धिंगाणा घातला होता. याचा व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामुळॆ काहीकाळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

औरंगाबाद शहरात नवीन वर्षाचे स्वागत करतानाचा उत्साह मोठा होता. पण आंबेडकरनगर परिसरातला एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात दोन तळीरामांमध्ये रस्त्याच्या मधोमधच हाणामारी झाली. याचे कारणही अगदीच किरकोळ होते. ‘तू माझ्याकडं का बघतो’ म्हणून दोन तळीराम एकमेकांना लाथा बुक्यांनी मारहाण करु लागले. पण वाद वाढतच गेला त्यामुळे दोघांनी एकमेकांना बुकलुन काढायला सुरूवात केली. त्यावेळी कोणीतरी पोलिसांना पाचारण केले. पण तरी देखील हे तळीराम बेल्टने एकमेकांना मारहाण करत होते. हा सगळा प्रकार तिथे उपस्थित तरुणांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले आणि हा वाद थांबवला आता त्यांच्या भांडणाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाकाबंदीच्या ठिकाणी विशेष पोलिस पथकांकडून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांची तपासणी करत कारवाई करण्यात आली.किरकोळ अपवाद वगळता कोणताही अनुचित प्रकार न घडता लोकांनी जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!