Latest Marathi News

बाॅयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये एकमेकींच्या झिंज्या धरत हाणामारी

तरुणींच्या हाणामारीचा 'तो' व्हिडिओ जोरदार व्हायरल, 'त्या' तरुणालाही दिला चोप

गोरखपूर दि २७(प्रतिनिधी)- गोरखपूर मध्ये मुलींमध्ये मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या घटनेमध्ये मुली केस पकडून कानशिलात लगावत असल्याचे समोर आले आहे. बाॅयफ्रेंडवरुन या तरुणी भिडल्याचे सांगितले जात आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ गोरखपूरमधील आहे.एका रेस्टाॅरेंटमध्ये मुलींच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. तब्बल २० मिनिटापर्यंत दोन ते तीन तरूणींकडून एका तरूणीला काठीने आणि केसाला धरून बेदम मारहाण करण्यात आली. अखेर सुरक्षारक्षकाच्या हस्तक्षेपानंतर  मार खाणा-या तरुणीची सुटका करण्यात आली. या हाणामारीत मुलींनी एका तरुणालाही मारहसण केली अहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रियकरावरून या दोन गटांमधील मुलींमध्ये हे भांडण झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोरखपूर पोलिसांनी या मुलींवर कारवाई केली आहे. पण सध्या हा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केले आहे.

मुलांमधील हाणामारी, ही सर्वसामान्य बाब आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये तरुणींची अनेक मारा हाणामारीच्या घटना समोर आल्या आहेत. लोकल ट्रेनतर हाणामारीच्या होण्याचे हमखास ठिकाण म्हणून ओळखले जाते. याआधीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!