नवरा लग्नाचा वाढदिवस विसरल्यावर पत्नीने केले भयंकर कृत्य
संतापलेल्या पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, वाढदिवसाएैवजी पोलिसांचा ससेमिरा
मुंबई दि २२(प्रतिनिधी)- मुंबईतील घाटकोपर परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने पती आणि सासूला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याला कारण ठरले आहे. पतीने लग्नाचा विसरलेला वाढदिवस. संताप अनावर झालेल्या महिलेने पती आणि सासूसोबत जोरदार भांडण करत त्यांना मरहाण केली आहे.
पीडित तरुण हा एका कुरिअर कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतो. तर त्याची पत्नी एका फूड आऊटलेटमध्ये नोकरीला आहे. त्यांचे लग्न १८ फेब्रुवारी २०१८ ला झाले होते. यावेळी त्यांच्या लग्नाचा ५ वाढदिवस होता. पण पती लग्नाचा वाढदिवस विसरल्याने पत्नीने पतीसोबत वाद घातला, यावेळी तिने सासु आणि नव-याला शिविगाळ केली. एवढ्यावरच न थांबता तिने आपल्या माहेरच्या लोकांना बोलावून घेत पती आणि सासूला मारहाण केली. जखमी झालेल्या दोघांनी राजावाडी रुग्णालयात उपचार घेतले, त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यावेळी पत्नीने आपल्याला तुझ्या सोबत रहायचे नसल्याचेही म्हटल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी महिला, तिचा भाऊ आणि आई वडील अशा चौघा जणांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू, असे आश्वासन पोलीसांनी दिले आहे.