Latest Marathi News
Ganesh J GIF

“माझ्या गर्लफ्रेंडकडे का बघतोस?”; पुण्यात प्रेमप्रकरणातून थरार

विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. येरवडा भागातील गोल्फ क्लब रोडवरील नेताजी चौक परिसरात प्रेमप्रकरणाच्या वादातून एका तरुणावर भररस्त्यात धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या रक्तरंजित प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

‘तू माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस?’ असा जाब विचारत राडा

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरुणाचे पूर्वी एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, कालांतराने त्यांचे मार्ग वेगळे झाले आणि त्या तरुणीचे दुसऱ्या तरुणाशी सूत जुळले. असे असले तरी, प्रेयसीचा जुना प्रियकर तिच्याकडे पाहतो, यावरून नवीन प्रियकराच्या मनात प्रचंड राग होता.त्याच रागाच्या भरात नवीन प्रियकराने आपल्या साथीदारांना सोबत घेऊन जुन्या प्रियकराला गाठण्याचा कट रचला.

दांडक्यांनी बेदम मारहाण अन् शस्त्राने वार

गोल्फ क्लब रोडवरील नेताजी चौक परिसरात आरोपींनी पीडित तरुणाला अडवले. “तू माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस?” असा जाब विचारत त्यांच्यात वाद सुरू झाला. काही वेळातच हा वाद इतका पेटला की आरोपींनी दांडक्यांनी तरुणाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी धारदार शस्त्राने तरुणावर सपासप वार केले.अचानक घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे नेताजी चौकात पळापळ आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

जखमी तरुणावर उपचार सुरू; आरोपी पसार

हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास चक्रांना गती दिली आहे. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले जात असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता का आणि यामध्ये एकूण किती आरोपींचा सहभाग होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!