मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र ठरणार?
विधानसभा अध्यक्षांनी उचलले मोठे पाऊल, आमदारांना पाठवली नोटीस, अजित पवार मुख्यमंत्री होणार?
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचे अधिकारी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. आता नार्वेकर याचा निर्णय घेण्याच्या अंतिम टप्प्यात आले असून, नार्वेकर यांनी आमदारांना नोटिस बजावली आहे. त्यामुळे लवकर निर्णय येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस पाठविली आहे. तसेच आपले म्हणणे मांडण्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली आहे. दोन्ही गटातील आमदारांच्या सुनावणीनंतर अपात्रतेच्या कारवाई होण्याची शक्यता आहे. अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना पुरावे सादर करावे लागणार आहेत. निवडणूक आयोगाकडून विधीमंडळास शिवसेनेच्या घटनेची प्रत प्राप्त झाली आहे. त्या घटनेनुसार शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करून लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानभा अध्यक्षांकडे सोपवला होता. मात्र, विधानसभा अध्यक्ष वेळेत निर्णय घेत नसल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत होता. यासाठी त्यांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. दरम्यान कायदेशीर बाबी तपासून योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे यापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आधीच स्पष्ट केले आहे. यापूर्वी विधानसभा अध्यक्षांकडे आमदार अपात्रतेसंदर्भात पाच याचिका आलेल्या आहेत. जर अगोदरचे दावे लक्षात घेतले तर ११ आॅगस्टच्या आता याबाबतचा निर्णय अपेक्षित असुन शिंदे अपात्र ठरल्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. पण हे सर्व दावे असुन नार्वेकर काय निर्णय घेणात हे महत्वाचे आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरणारे, बालाजी कल्याणकर या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम असणार आहे.