Latest Marathi News
Ganesh J GIF

भररस्त्यात तरुणीचा तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला

घटनेचा व्हिडीओ व्हायरल, तरूणीचा संताप इतका की लोक पाहतच राहिले आणि...

जळगाव दि ८(प्रतिनिधी)- जळगावमध्ये एका तरूणीने भरदिवसा तरूणाला भोसकल्याची घटना समोर आली आहे. तरुण तरुणीच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तरुणावर तरुणी चाकूने वार करताना दिसत आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

जळगावमधील अजिंठा चौकात हा प्रकार घडला असून भरदिवसा एका तरुणीने शिवीगाळ करत तरुणावर चाकू हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार अजिंठा चौकात हॉटेल महिंद्राजवळ एका तरूण आणि तरुणीमध्ये वाद सुरु होता. तरुणी हातात चाकू घेऊन तरुणाशी रागाने बोलत होती. काही वेळाने वाद इतका टोकाला गेला की तरुणीने थेट छोटा चाकू काढला आणि तरुणाला शिवीगाळ करत त्याच्या छातीवर सपासप वार केले. चाकूने वार केल्यामुळे तरुणाचा छातीतून रक्त येऊ लागले यादरम्यान, तरुण हा तरुणीकडील चाकू हिसकावण्याचा प्रयत्न करत होता. या वादात तरुणाने त्याचे अंगावरील शर्ट फाडून टाकला आणि तरुणीला माझा मर्डर करुन टाक असे आव्हान दिले. भर दिवसाच्या या प्रकाराने शहरात मोठी खळबळ उडाली असून यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. पण कोणीही भांडण सोडवण्यासाठी पुढे आले नाही.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता पण नंतर तो काही कारणास्तव डिलीट करण्यात आला दरम्यान भांडण करणारे तरुण तरुणी कोण आहे हे कळू शकले नाही. पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे सांगितले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!