Latest Marathi News

शिंदे सरकारमधील मंत्र्याची संपत्तीत कोट्यावधींचे उड्डाने

कोट्याधीशांच्या कानी सर्वसामान्यांचा आवाज पोहोचणार का?

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- शिंदे- फडणवीस सरकारचा लाभलेला बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. शिंदे गटाकडून ९ तर भाजपाकडून ९ अशा एकूण १८ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. पण या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संपत्ती पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.सर्व मंत्री कोट्याधीश आहेत.

शिंदे सरकारच्या या मंत्रिमंडळात भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा हे सगळ्यात श्रीमंत, तर संदीपान भुमरे यांची संपत्ती सगळ्यात कमी आहे.पाहुयात कोणत्या मंत्र्यांकडे नेमकी किती संपत्ती आहे. त्याचबरोबर १८ पैकी १२ मंत्र्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पाहुयात कोणत्या मंत्र्याकडे नेमकी किती संपत्ती आहे.

*भाजपातील मंत्री*

सुधीर मुनगंटीवार           ११.४ कोटी
सुरेश खाडे                    ४ कोटी
राधाकृष्ण विखे पाटील    २४ कोटी

चंद्रकांत पाटील            ५.९९ कोटी

मंगलप्रभात लोढा           ४४१कोटी

अतुल सावे                     २२ कोटी
विजयकुमार गावित         २७ कोटी
गिरीश महाजन                २५ कोटी

 

शिंदे गटातील मंत्री

तानाजी सावंत               ११५ कोटी
दादा भुसे                        १० कोटी
दीपक केसरकर                ८२ कोटी
संजय राठोड                      ८ कोटी
उदय सामंत                        ४ कोटी
शंभुराज देसाई                 १४ कोटी
गुलाबराव पाटील                ५ कोटी
अब्दुल सत्तार                   २० कोटी
संदिपान भुमरे                    २ कोटी

शिंदेच्या मंत्रिमंडळात सर्वच मंत्री कोट्याधीश आहेत.त्यामुळे कोट्याधीशांच्या या मंत्रीमंडळाकडून सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण होऊ शकेल का अशी शंका नागरीक व्यक्त करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!