गाझियाबाद दि ९ (प्रतिनिधी)- लग्न करण्यास नकार दिल्यामुळे प्रेयसीने प्रियकराची गळा चिरुन हत्या केली आहे. गाझियाबादमधील या धक्कादायक प्रकारनं संपूर्ण परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे. प्रेयसीने वस्ता-याने गळा चिरत प्रियकराची हत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रेयसी प्रिती शर्मा आपल्या पतीपासून चार वर्षांपूर्वी वेगळी राहत होती. पती पासून वेगळी झाल्यावर ती आपला प्रियकर फिरोज सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली होती. तिला फिरोजसोबत लग्न करायचे होते. होता. तसा तगादा तिने फिरोजच्या मागे लावला होता. पण फिरोज मात्र तिला नकार देत होता.त्यामुळे रागातून तिनं त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह लपवण्यासाठी तिनं एक मोठी ट्रॉली बॅग घेतली. त्यामध्ये प्रियकराचा मृतदेह भरुन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ती जात होती. त्यावेळी पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडत अटक केली. पोलीसांनी सांगितले की, आम्ही रात्री टीला मोडजवळ गस्तीवर होतो. त्यावेळी आम्ही तिला ट्रॉली बॅग घेऊन जाताना पाहिलं. महिला कॉन्स्टेबलनं जेव्हा तिची झडती घेतली, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. बॅगमध्ये तिचा प्रियकर फिरोजचा मृतदेह होता. अशी माहिती पोलीसांनी दिली. या घटनेने गाझीयाबाद परिसरात खळबळ उडाली आहे.