Just another WordPress site

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

पहा कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळाले

मुंबई, दि १४ (प्रतिनिधी)-   राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:*

राधाकृष्ण विखे-पाटील –

महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार-

वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील-

उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी विकास

गिरीष महाजन

ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील

पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे

बंदरे व खनिकर्म

संजय राठोड

अन्न व औषध प्रशासन

GIF Advt

सुरेश खाडे

कामगार

संदीपान भुमरे

रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत

उद्योग

प्रा.तानाजी सावंत

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार

कृषी

दीपक केसरकर

शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे

सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई

राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा

पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!