Latest Marathi News
Ganesh J GIF

दिल्लीत भररस्त्यात तरुणीला मारहाण करत गैरवर्तन

घटनेचा व्हिडिओ व्हायरल, राजधानीत महिला आजही असुरक्षित?

दिल्ली दि १९(प्रतिनिधी)- सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तरुण एका तरुणीला जबरदस्ती गाडीत ढकलत असून नंतर बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं दिसत आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.

व्हायरल व्हिडीओ दिल्लीमधील आहे.व्हिडीओत एक तरुण वर्दळीच्या रस्त्यावर एका तरुणीला जबरदस्ती कारमध्ये ढकलत असल्याचे दिसत आहे. यावेळी एका कारमधील व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला आहे. यावेळी त्या तरुणीला मारहाण देखील करण्यात आली आहे. रस्त्यावर लोकांची वर्दळ होती.पण एकही व्यक्ती त्यांना जाब विचारत नाही, किंवा मदतीला येत नाही. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून पोलिसांनी याची दखल घेतली आहे. गाडीच्या मालकाचा पत्ता हरियाणाच्या गुरुग्राममधील असून, पोलिसांचं पथक तिथे पाठवण्यात आले आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये अनेकांनी मंगलपूरी फ्लायओव्हरवर ही घटना घडल्याचे सांगितले आहे.

दोन मुलं आणि एका मुलीने रोहिणी ते विकासपुरीसाठी कॅब बूक केली होती. पण प्रवासात त्यांच्यात काहीतरी वाद झाला. यानंतर तरुणी कार सोडून निघून जात होती. यावेळी तरुणाने तिला पकडलं आणि पुन्हा कारमध्ये ढकलून घेऊन गेले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!