Just another WordPress site

सिंचन घोटाळा पुन्हा बाहेर काढण्यामागे भाजपाची ‘ही’ रणनिती

अजित पवारांबरोबर एकनाथ शिंदेचीही होणार अडचण

मुंबई दि १७ (प्रतिनिधी)- राज्यात राजकारणात मागील दोन तीन महिन्यापासून अभूतपूर्व घटना घडत आहेत. शिवसेने विरुद्ध बंड करून एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे सरकार पडून आता भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे, मात्र हे प्रकरण न्यायालयात गेल्याने भाजप शिंदे गटाबाबत साशंक आहे. त्यामुळे शिंदेशिवाय कोण याची भाजपात चाचपणी करत आहेत. त्यातूनच अजित पवार यांना ट्विटद्वारे इशारा देत आपल्याकडे खेचण्याचा डाव भाजपाने आखला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीत आॅपरेशन लोटस होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेला सुरंग लावत तब्बल ४० आमदार घेऊन वेगळा पक्ष स्थापन केला. पण शिंदेसह इतर आमदारांना अपात्र ठरवण्याची शिवसेनेची याचिका न्यायालयात दाखल असून त्यावर सुनावणी चालू आहे. पण न्यायालयात आजवरच्या सुनावणीत शिंदे गटात बॅकफुटवर असल्याच दिसून आल. पक्षातर बंदी कायद्यानुसार जर इतर पक्षात प्रवेश करावा लागला तर शिंदे गटात फूट पडू शकते शिवाय मंत्रीपदावरून देखील शिंदे गटात नाराजी आहे. त्यामुळे भाजपा शिंदेबाबत साशंक आहे. त्यामुळे जर न्यायालयाचा निकाल शिंदेविरोधात गेला तर सरकार टिकवण्यासाठी भाजपा दुसरा भिडू शोधत आहे. त्यासाठी फडणवीसांचे जुने सहकारी म्हणून अजित पवारांकडे पाहत आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांच्या दाव्यामुखे ट्विट याला बळकटी मिळाली त्या म्हणाल्या की, “भाजपला सध्याच्या सरकारमधून शिंदे गट बाहेर पडेल, अशी भीती वाटतेय म्हणूनच भाजपाचा हा प्लॅन बी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकून त्यांना सोबत घ्यायचा भाजपचा विचार आहे. भाजप कुणाचीही फाईल हवी तेव्हा ओपन करते, हवी तेव्हा बंद करते.. विरोधी पक्षाला गप्प करण्याचा आणि अजित पवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी हा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप अंजली दमानियांनी केला आहे. त्यामुळेच मोहित कंबोजच्या माध्यमातून सिंचन घोटाळ्याचे भुत पुन्हा बाहेर काढण्यात आले आहे.

GIF Advt

सिंचन घोटाळा काय आहे

१९९९ ते २००९ या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यावेळेच्या विरोधी पक्षासह सामाजिक कार्यकर्त्यांनी केला होता. सिंचनावर ७०,००० कोटी रुपये खर्च झाले, पण सिंचन क्षेत्रात केवळ ०.१ टक्क्यांची सुधारणा झाली असं निरीक्षण सरकारच्याच आर्थिक पाहणी अहवालात नोंदवण्यात आल होत.या काळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते.सिंचन प्रकल्पांच्या कंत्राट वाटपात तसंच त्यांच्या पूर्ततेमध्ये अनियमतता आढळली अशी नोंद कॅगने आपल्या अहवालात केली होती. अजित पवार आणि सुनिल तटकरे यांच्यावर थेट आरोप करण्यात आले होते.
२०१९ मध्ये पहाटे पहाटे फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने ओैटघटकेचे सरकार स्थापन केले होते. त्यावेळी अजित पवारांना क्लिनचिट देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. पण आता पुन्हा एकदा अजित पवारांना खेचण्यासाठी सिंचन घोटाळ्याचे सिंचन करण्यात येत आहे.
अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणातून एसीबीकडून देण्यात आलेल्या क्लीन चिटचा रिपोर्ट अजूनही उच्च न्यायालयाने स्वीकारला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने अजूनही हा रिपोर्ट प्रलंबित ठेवला आहे. त्यामुळेच जर शिंदेची साथ सुटलीच तर अजित पवारांना सोबत घेण्याचा मनसुबा भाजपाचा आहे. पण जर शिंदे सोबत राहिले तर विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवारांनी जास्त आक्रमक होऊ याची रणनिती भाजपा आखत आहे.

भाजप राष्ट्रवादीत आॅपरेशन लोटस राबवण्याची आखणी करत आहे यात ते यशस्वी होणार का? कारण त्यांना शरद पवारांचे चक्रव्यूह भेटावे लागणार आहे. शिवाय अजित पवार साथ देतील का याचीही खात्री नाही या घडामोडीत एकनाथ शिंदेही दुखावू नयेत याची खबरदारी भाजप घेत आहे. त्यातूनच मोहित कंबोजच्या माध्यमातून ट्विट करत परिस्थितीची चाचपणी भाजप करत आहे. यार ते यशस्वी ठरणार का? याचे उत्तर पुढील काळात मिळणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!