पुण्यात वॉचमनकडून तरुणीचा जबरदस्ती गर्भपात
प्रेमाच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार, तरुणावर गुन्हा दाखल
पुणे दि १३(प्रतिनिधी)- पुण्यातील लोणीकंद परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने तरुणीवर लैंगिक अत्याचार करत त्ती गर्भवती राहिल्यानंतर जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर तो येरवडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
राकेश अंकुश विटकर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार डिसेंबर २०१८ ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत घडला आहे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार खराडी परिसरात राकेश हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्याची तिथेच राहणाऱ्या मुलीशी मैत्री झाली. त्यातूनच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर त्यांच्यात शरीर संबंध झाले. त्यातून ती तरुणी गर्भवती राहिली. ही गोष्ट राकेशला समजताच त्याने जबरदस्तीने तरुणीच्या मनाविरुद्ध गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्या दोघांत अनेकवेळा वादही झाले. हा धक्का सहन न झाल्याने तरुणीने लोणीकंद पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दखल करून घेत हा प्रकार खराडी परिसरात घडला असल्याने हा गुन्हा येरवडा पोलिसांकडे वर्ग केला आहे . या प्रकरणाचा अधिक तपास येरवडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कवितके करत आहेत.