Latest Marathi News
Ganesh J GIF

किराणा माल दुकानात बेकायदा गॅस विक्री जीवावर बेतली..

पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील किरकटवाडी भागात एका किराणामाल दुकानात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची बेकायदा विक्री करणे एका अल्पवयीन मुलीच्या जीवावर बेतले आहे.

यामध्ये गॅसगळतीनंतर झालेल्या स्फोटात गंभीर भाजलेल्या १५ वर्षीय मुलीचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. गीता मन्नाराम चौधरी (वय १५  , रा. प्रेम सुपर मार्केट, माळवाडी, किरकटवाडी, सिंहगड रस्ता)  असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे. तसेच या दुर्घटनेत मुलीचे वडील मन्नाराम चौधरी (वय ४५ ) हे देखील जखमी झाले आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?

चौधरी यांचे किरकटवाडी भागातील माळवाडी येथे किराणा माल विक्रीचे दुकान आहे. किराणा माल दुकानात ते स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची बेकायदा विक्री करीत होते. मोठ्या गॅस सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरण्यासाठी त्यांनी एक गोदाम भाड्याने घेतले होते. त्या ठिकाणी चौधरी बेकायदा गॅस भरण्याचे काम करत असत. गुरुवारी सकाळी गॅस भरत असताना अचानक गॅसची गळती झाली आणि आगीचा भडका उडाला.

या आगीच्या भडक्यात चौधरी आणि त्यांच्या दोन मुली गंभीररीत्या होरपळल्या. यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एका मुलीचा सोमवारी उपचारदरम्यान मृत्यू झाला तर दुसऱ्या मुलीवर अजूनही उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!