Latest Marathi News
Ganesh J GIF

‘महात्मा गांधी जुन्या तर नरेंद्र मोदी नवीन भारताचे राष्ट्रपिता!’

माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे वादग्रस्त विधान, आरएसएस बाबत गाैप्यस्फोट

नागपूर दि २१(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सतत वादात सापडत असतात आता त्या पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत.अमृता फडणवीस यांनी देशाचे दोन राष्ट्रपिता असून एक महात्मा गांधी तर दुसरे नरेंद्र मोदी हे आहेत असं विधान केलं आहे. त्यावरून वाद निर्माण झाला आहे.

अमृता फडणवीस या नागपूर येथे अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे आयोजित अभिरूप न्यायालय कार्यक्रमाला उपस्थित होत्या.यावेळी त्यांच्यासोबत सवाल जवाब करण्यात आले. अमृता फडणवीस म्हणाल्या, “आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता असून महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत. त्याचबरोबर माझ्या वक्तव्यावर सामान्य लोक मला ट्रोल करीत नाही. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे ट्रोलर आपल्याला ट्रोल करतात असे त्या म्हणाल्या. यावेळी तुम्हाला मामी का म्हणतात या प्रश्नावर त्या म्हणाल्या की फडणवीस माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांना मामु म्हणतात त्यामुळे मला मामी म्हटले जाते, पण आपल्याला काही फरक पडत नाही असेही त्या म्हणाल्या विशेष म्हणजे आपण फक्त माझ्या आई व सासूबाईंना घाबरते असेही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

महत्वाचे म्हणजे मी जास्त बोलले तर माझे आणि देवेंद्र आम्हा दोघांचेही नुकसान होते, ही बाब मला कळून चुकली आहे. याचा फायदा अनेकांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून घेतला आहे. मी खूप बोलते अशी तक्रार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे करण्यात आली होती असा गाैप्यस्फोट अमृता फडवणीस यांनी केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!