Just another WordPress site

पुण्यात अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत सामूहिक अत्याचार

नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी, सांस्कृतिक राजधानीत महिला असुरक्षित?

पुणे दि २८(प्रतिनिधी)- पुण्यात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ६ जणांना चतुर्श्रुंगी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जुलै ते २३ डिसेंबर २०२२ या कालावधीत घडली आहे.

GIF Advt

बलात्कार प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. ओम राजु तिंबोळे, जय राजु तिंबोळे, अनिल जाधव, सुनिल जाधव, शुभम आणि किरण जावळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल जाधव या व्यक्तीने अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत घाबरवले आणि अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढून ते आपल्या मित्रांना पाठवले. त्यानंतर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून अत्याचार केले. संतापजनक म्हणजे २३ डिसेंबर रोजी दुपारी तिला एका ठिकाणी बोलावून सहा जणांनी तिच्यवर सामूहिक बलात्कार केला. या बलात्कारानंतर मुलीला त्रास होऊ लागल्याने ही घटना तिने आईला सांगितली. आईने थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीसांनीही तातडीने कारवाई करत सहा जणांना अटक केली आहे.

पुण्यात दोन दिवासंपूर्वी एका प्रसिद्ध उद्योजकाने ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने एका १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आल्याने पुण्यात महिला सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर आले आहे. अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त करत सुरक्षेची मागणी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!