Latest Marathi News
Ganesh J GIF

मंत्रिपदाच्या रेसमध्ये २ आमदारांची नावं चर्चेत; पुण्यातील ‘या’ शिलेदाराचेही नाव चर्चेत ; मंत्रिमंडळात नेमकी कोणाची वर्णी लागणार?

पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला आपला गड राखण्यात यश आले आहे. भाजपने दौंड तालुक्यातील आपली जागा कायम राखली आहे.पुरंदरमध्ये शिवसेना शिंदे गटाने आपली जागा काबीज केली आहे. खेडमध्ये शिवसेना उबाठा गटाने यश मिळवले आहे, तर जुन्नर मतदारसंघात अपक्ष शरद सोनवणे यांनी जोरदार मुसंडी मारली आहे.

सध्या मंत्रिपदासाठी जिल्ह्यात बारामती अजित पवार, आंबेगाव दिलीप वळसे-पाटील, दौंड राहुल कुल, पुरंदर विजय शिवतारे तसेच जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे, जर जातीय समीकरणाद्वारे पाहिलं तर दत्तात्रय भरणे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. त्यामुळे जिलह्यातील पाच शिलेदार मंत्रिपदाच्या रेसमध्ये असल्याचे दिसून येत आहे. परंतु, आज होणाऱ्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार? याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच आजच्या मंत्रिमंडळाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.बारामतीत काका विरूद्ध पुतण्या झालेल्या लढाईत अजित पवार यांनी आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. दौंड तालुक्यात झालेल्या थोरात – कुल यांच्या लढाईत राहुल कुल यांनी आपल्या विकासकामांच्या जोरावर आमदारकी कायम राखली आहे. पुरंदरमध्ये विजय शिवतारे यांनी काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांचा दारुण पराभव केला आहे.

शिवतारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्यांच्या नावांची चर्चा होऊ शकते, असा मतप्रवाह राजकीय वर्तुळात सुरू आहे. आंबेगाव तालुक्यात दिलीप वळसे-पाटील यांनी देवदत्त निकम यांचा पराभव केला आहे. तसेच अनेक वर्षे मंत्रिमंडळातील अनुभवी नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. त्यामुळे मंत्रिपदाच्या शर्यतीतील चेहरा कायम आहे. जुन्नरचे नवनिर्वाचित आमदार शरद सोनवणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मित्र आहेत. शरद सोनवणे पुणे जिल्ह्याचे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. यावेळी जुन्नरला शरद सोनवणे यांच्या रुपाने मंत्रिपद मिळणारच, असा जनतेतून सूर आहे आणि एकनाथ शिंदे तो पूर्ण करतील, असेही बोलले जात आहे. मंत्रिमंडळात जातीय आरक्षणानुसार पाहिलं तर धनगर समाजाचे नेतृत्व म्हणून इंदापूर तालुक्यातून आमदार दत्तात्रय भरणे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!