
पुण्यातील बारामतीमधून एका अपघाताची बातमी समोर आली आहे. बारामतीमध्ये आणखी एक विमान अपघात झाला आहे. दोन आसनी प्रशिक्षण विमान कोसळल्याने परिसरात घबराट पसरली आहे. पुण्यातील बारामतीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे.

बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आता आणखी एक विमान अपघात झाला आहे. बारामतीच्या गोजुबाबी गावात दोन आसनी प्रशिक्षण विमान कोसळले. इंजिन निकामी झाल्यामुळे बारामतीच्या गोजुबाबी भागातील उसाच्या शेताजवळ ‘रेड बर्ड’ विमान कोसळले.प्राथमिक माहितीनुसार, विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वैमानिक आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा हा मोठा अपघात घडला. सध्या, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

मिळालेल्या माहितीनुसार क्रॅश लँडिंग दरम्यान विमानाचा एक भाग विजेच्या खांबाला धडकला आणि त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. विमानात फक्त एक प्रशिक्षणार्थी वैमानिक होता. सुदैवाने, वैमानिक गंभीर जखमी झाला नाही.आज उत्तर महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट असून, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जना आणि पावसाचा इशारा जारीबारामतीमधील विमान अपघातामुळे हवाई वाहतूक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या विमानांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे


