Latest Marathi News

प्रेमविवाह केल्याने तरुणीच्या नातेवाईकाची तरुणाला बेदम मारहाण

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, नवविवाहित जोडप्याचं सिनेस्टाईल अपहरण

जयपूर दि २०(प्रतिनिधी)- जयपूरमध्ये काही लोकांनी एका नवविवाहित जोडप्याला दिवसाढवळ्या मारहाण करून पळवून नेल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल आहे. त्याच बरोबर खळबळ उडाली आहे.

जयपूर जिल्ह्यातील जामवरमगड येथे राहणारा पृथ्वीराज हा फायनान्सचा व्यवसाय करतो. अनेक वर्षांपूर्वी तो त्याच्यापेक्षा एक वर्ष लहान असलेल्या पूजा योगीच्या प्रेमात पडला होता. काही वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर दोघांनी लग्न केले. मुलीच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे मुलीचे नातेवाईक कार घेऊन जयपूरच्या हरमदा भागात पोहोचले आणि तिथे किरायाच्या घरात राहत असलेल्या नवविवाहित जोडप्याला त्यांनी सार्वजनिकरित्या बेदम मारहाण केली. यात तरुणाचे नाक देखील कापल्याची माहिती आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी दोघांनाही फरपटत नेत गाडीत टाकले आणि त्यांचे अपहरण करत पळवून नेले. याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. तरूणाच्या वडीलांनी पूजाच्या कुटुंबीयांनी आपला मुलगा आणि सुनेला इजा केल्याची भीती  पोलिसांसमोर व्यक्त केली आहे.

रामलाल यांनीच हरमदा पोलिस ठाण्यात त्यांचा मुलगा आणि सुनेच्या अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ‘ऑनर किलिंग’च्या दृष्टीने राजस्थान पोलीसांनी तपास सुरु केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!