‘तुम मुख्यमंत्री हो तो, हम भी मुख्यमंत्री बनना चाहते है’
शिंदे गटातील आमदाराने बोलून दाखवली मनातली इच्छा,शिंदेवर साधला निशाना?
अमरावती दि ६(प्रतिनिधी)- आक्रमक लोकप्रतिनिधी आणि जनतेतला आमदार अशी प्रतिमा असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांना अद्यापही मंत्रीपद मिळालेले नसतांना त्यांनी थेट आता मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले ‘प्रहार आपला स्वतःचा पक्ष आहे, आपल्या मातीतला आपण निर्माण केलेला पक्ष आहे, लोक आम्हाला म्हणाले गद्दारी केली, आम्ही काही गद्दारी केली नाही.. आमचा स्वतंत्र पक्ष आहे असे म्हणत तुम अगर मुख्यमंत्री बनना चाहते तो हमे भी बनना है. आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. पूर्वी सुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री पदावरच आपला दावा केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करत कडू यांना इशारा शिंदेकडे असल्याची चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीत स्वतःकडे असलेले राज्यमंत्री पद सोडत कडू यांनी शिंदेगटाला साथ दिली होती. पण त्यांना नव्या सरकारमध्ये मंत्रीपद नाकारण्यात आले. त्याचबरोबर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही रखडलेला आहे. त्यातही कडू यांना मंत्रीपद दिले जाणार का नाही याबाबत साशंकता नाही. त्यामुळे मंत्रिपद मिळालं नसलं तरी आता बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रीपद नसल्याने बच्चू कडू यांची अस्वस्थता अनेकदा दिसून आली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जाहीरपणे टिका केली आहे. कडूंच्या या वक्तव्यामुळं चर्चांन उधाण आलं आहे. याला एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार याची उत्सुकता लागली आहे. त्याचबरोबर शिंदे गटातील बेदीली समोर आलीय.