Just another WordPress site

उद्धव ठाकरेंची शिवभोजन थाळी योजना बंद होणार?

शिंदे सरकार या कारणामुळे योजना बंद करणार,वादाची शक्यता

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाविकास आघाडीच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्याने शिंदे- फडणवीस सरकार ही योजना बंद करण्याची शक्यता आहे.ही योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसणार आहे.

राज्यातील जनतेला या योजनेतंर्गत १० रुपयांत जेवण तर कोरोना काळात ५रुपयात जेवण मिळत होते. यावरून सत्ताधारी विरोधक भिडण्याची शक्यता आहे.शिवसेनेने निवडणूकीच्या जाहिरनाम्यात याची घोषणा केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पुढाकाराने ही योजना २६ जानेवारी २०२० ला सुरू करण्यात आली होती. राज्यात १ लाख ८८ हजार ४६३ एवढ्या थाळ्यांची सरासरी विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहे. ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून मदत दिली जाते. याची संख्या २ लाखांपर्यंत नेण्याचा ठाकरे सरकारने प्रस्ताव होता. पण सत्तांतर झाल्यानंतर शिंदे सरकारने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही.राज्य सरकारकडून शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान दिले जात होते. ग्रामीण भागातील केंद्रचालकांना एका थाळीमागे 50 रुपये आणि शहरी भागातील थाळी चालकांना 35 रुपये अनुदान देण्यात येत होते. यात गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्याने ही योजना बंद करण्याचा सरकारचा मानस आहे.

GIF Advt

शिवभोजन थाळी केंद्र चालकांना राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते. शिवभोजन थाळीत एक वाटी भाजी, दोन चपात्या, भात व वरणाचा समावेश असतो. गरिबांना, गरजूंनाा सहज व अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. ती बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!