Latest Marathi News
Ganesh J GIF

‘हिंदू आहेस मुस्लीम तरूणीसोबत का फिरतोस’

जमावाची हिंदू तरूणाला बेदम मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल

पाटणा दि १७(प्रतिनिधी)- द केरळ स्टोरी चित्रपटात लव्ह जिहाद बद्दल अप्रत्यक्षपणे भाष्य करण्यात आले आहे. पण अशातच बिहारच्या पाटणा शहरात १५ मे या दिवशी मुसलमान तरुणीसोबत दुचाकीवरून जाणार्‍या हिंदु तरुणाला मुसलमान समुदायातील लोकांनी बेदम मारहाण केली आहे.

बिहारची राजधानी पाटण्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. मुस्लिम वर्गमैत्रिणीला बाईकवर बसवल्याने एका हिंदू तरुणाला काही लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओही शूट करून तो सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. मुस्लीम तरूणीसोबत का फिरतोस असा जाब विचारत हिंदू तरूणाला ही मारहाण करण्यात आली. व्हायरल व्हिडीओत सागर कुमार मिश्रा नावाचा तरुण आपल्या मुस्लिम वर्गमित्रासह दुचाकीवरून कुठेतरी जात होता. यावेळी काही तरुणांनी त्याची दुचाकी थांबवली आणि त्याला कुठे जातोय अशी विचारणा केली. तो हिंदु आहे हे समजताच जमावाने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मित्राला मारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना ती तरुणी तो फक्त माझा वर्गमित्र आहे असे सांगत होती. मात्र, जमावाने तिच न ऐकता तिला तिच्या
घरी जाण्यास सांगितले. विशेष म्हणजे तरुणांनी युवकाला मारहाण करताना व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मिडियावर व्हायरल केला आहे.

राजस्थानमधील एका व्यक्तीला त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याने ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाबद्दल सकारात्मक लिहिल्यामुळे मारहाण करण्यात आली होती. दरम्यान या जमावाविरोधात पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!