मुंबई दि १०(प्रतिनिधी)- निवडणुकीत एकत्र यायचे, मित्र पक्षातील लोकांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी घ्यायची घ्यायची आणि हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे, ही भाजपची रणनिती आहे. अशी शब्दात भाजपावर टिका करत शरद पवारांनी नितिश कुमार यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.महाराष्ट्रात शिवसेनेत फूट कशी पडेल, अशी परिस्थिती निर्माण केली. अशीच खेळी बिहारमध्ये सुरू होण्याआधीच नितीश कुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आता भाजपचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. परंतु नितीश कुमारांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे आहे, असे सांगत शरद पवार यांनी नितिश यांना समर्थन दिले आहे.
शरद पवार म्हणाले की,”भाजप त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवते. नितीश कुमार यांची हीच तक्रार आहे. पंजाबमध्ये अकाली दलासारखा मोठा पक्ष भाजपसोबत होता. प्रकाशसिंग बादल यांच्यासारखे मोठे नेते भाजपची साथ देत होते. मात्र, अकाली दल हा पक्ष जवळपास संपुष्टात आला आहे. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजप अनेकवर्षे एकत्र होते. पण आज भाजपाने शिवसेना फोडली आहे. हेच चित्र बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये दिसत आहे, पण नितिश सावध झाले अस म्हणत शरद पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तर महाराष्ट्रातही भाजपने शिवसेनेसोबत एकत्र निवडणूक लढवताना त्यांचे कमी आमदार कसे निवडून येतील,याची काळजी घेतली. असा आरोप केला आहे.
धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणं योग्य नाही’, असं म्हणत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घ्यावी जमल्यास वेगळा पक्ष काढू शकतात अस म्हणत आपण काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर वेगळा पक्ष काढला असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.