Latest Marathi News
Ganesh J GIF

“पवारांचं दु:ख जरा वेगळंच आहे”

पहा देवेंद्र फडणवीस अस का म्हणाले

मुंबई दि १० (प्रतिनिधी)-भाजपाकडून प्रादेशिक पक्षांना आणि सहकारी पक्षांना संपविण्यात येत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. या आरोपाला देवेंद्र फडणीसांनी प्रत्युत्तर दिल आहे. पवारांचं दु:ख जरा वेगळंच आहे, अशी तिरकस प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

आमच्याकडे ११५ आमदार आहेत, आमच्या मित्र पक्षाकडे ५० आमदार आहेत. तरीही आमच्या मित्रपक्षाला मुख्यमंत्री पद दिले. पवारसाहेबांचं दु:ख जरा वेगळंय, ते आपल्या सर्वांनाच माहितीय,” असे म्हणत फडणवीस यांनी शरद पवारांना प्रत्यु्त्तर दिल. बिहारमधील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना पवार म्हणाले की, वेळीच सावध होत नितीश कुमारांनी शहाणपणाचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेवरही भाजपाने आघात केला. भाजपा मित्रपक्षांना दगा देतं हीच नितीश कुमारांची देखील तक्रार होती. नितीश कुमार यांनी भाजपसोबत घेतलेल्या फारकतीवर पवारांनी वरील वक्तव्य केलं आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचचं असून शिंदे गटाचं नाही असेही पवारांनी स्पष्ट केले आहे.

पक्ष चिन्हावरील वादाच्या पवारांच्या विधानावर फडणवीस म्हणाले की, ज्यावेळी पवारांनी पक्ष बदलला त्यावेळी कायदेच नव्हते. त्यावेळी डिफेक्शनचे कायदे नव्हते. त्यामुळे कोणालाही कसंही बदलता येत होतं. मात्र, आज याबाबत कायदे तयार झालेले असून, त्यामुळे कायदेशीर लढाई करावी लागते. या सर्वावर शिंदे कायदेशीर लढाई करत असल्याचेही फडणवीसांनी स्पष्ट केले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!